Saturday, April 27, 2024

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ महिला उमेदवाराच जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांनी बुधवारी (ता २७) रामटेकमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने काँग्रेससमोर मोठी अडचण होण्याची शक्यता आहे

रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र बनावट आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता. यावर हायकोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. मंगळवारी (ता. २६) कोर्टाने यावर सुनावणी घेत रश्मी बर्वे यांना दिलासा देखील दिला होता. मात्र, आज जातपडताळणी समितीने त्यांचं प्रमाणपत्र रद्द केलं आहे.
नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी बर्वे या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत. बर्वे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता. मात्र, ही उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचाही मुद्दा समोर आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles