Wednesday, November 29, 2023

एमआयडीसीतील कंपनीत युवतीचा वियनभंग,तरुणाविरूध्द गुन्हा दाखल

अहमदनगर-एमआयडीसीतील एका कंपनीत असलेल्या युवतीचा एका तरुणाने कंपनीतच विनयभंग करून मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. 15) सकाळी घडली. याप्रकरणी पीडित युवतीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरूध्द विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकेस गंगाराम यादव (रा. चेतना कॉलनी, एमआयडीसी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादी युवती एमआयडीसीतील कंपनीत कामाला असून त्याच कंपनीत यादव काम करतो. रविवारी सकाळी 7:50 वाजता फिर्यादी युवती कंपनीत असताना यादव तिच्या जवळ आला. त्याने युवतीची छेड काढून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्याने फिर्यादीकडे मोबाईल नंबरची मागणी केली असता फिर्यादीने त्याला कशाला मोबाईल नंबर पाहिजे, अशी विचारणा केली.

दरम्यान, सदरचा प्रकार घडल्यानंतर फिर्यादी युवतीने आरडाओरडा केला असता यादव म्हणाला, सदरचा प्रकार कोणाला सांगितला तर तुला दाखवतो, असे म्हणून मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पीडित युवतीने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला व दुपारी फिर्याद दिली. पोलिसांनी यादव विरूध्द विनयभंग, मारहाण कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार चौधरी करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: