Saturday, December 7, 2024

मोठी बातमी!राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

महाविकास आघाडी मधील काही राजकीय नेत्यांची फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची अखेर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 1988 च्या बॅचच्या आयपीएस असलेल्या रश्मी शुक्ला यांची कारकीर्द मोठ्या वादात सापडली होती.

शुक्ला यांच्यावरती पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी वेगवेगळे दोन गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. पुढे दोन्ही गुन्हे कोर्टाने रद्द केले. नाना पटोले, संजय काकडे, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडी मधील अनेक नेत्यांची फोन टॅपिंग प्रकरणाची शुक्ला यांच्यावर आरोप होते
रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) अतिरिक्त महासंचालक म्हणूनही काम केले आहे. शुक्ल यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तचर शाखेचे संचालक म्हणून काम केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles