सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टींचा ट्रेंड सतत बदलत असतो. मग ती गाणी असो किंवा एखादा डान्स व्हिडीओ, यावर सतत विविध गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रिल्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रिल्स बनवतात. मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’ हे मराठमोळं गाणं तुफान चर्चेत आहे. या गाण्यावर लोकांनी लाखो रिल्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. दरम्यान, आता सध्या सोशल मीडियावर ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सुसेकी’ गाणं खूप चर्चेत आहे, ज्यावरील अनेक व्हिडीओदेखील व्हायरल होत आहेत.
हल्लीची लहान मुलं पटकन नवनवीन गोष्टी शिकतात, अनेकदा अभ्यासापेक्षा त्यांचे सोशल मीडियाच्या ट्रेंडवर अचूक लक्ष असते. एखादे नवीन गाणे आले की ते त्यांच्या नेहमीच तोंडपाठ असते. अनेकदा शाळेत शिकवलेल्या कविता त्यांच्या लक्षात राहत नाहीत, पण रिल्समधील गाणी ते नेहमी पटापट बोलतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येदेखील अशाच एका लहान गोड मुलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यावर ती ‘पुष्पा २’ मधील ‘सुसेकी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.