व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमधील असल्याचे म्हटले जात आहे. या हॉस्टेलमधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मेसमध्ये हे जेवण दिले जात होते. यावेळी तेथील एका चटणीच्या भांड्यात चक्क जिवंत उंदीर तरंगताना दिसला.चटणीने भरलेल्या भांड्यात जिवंत उंदीर बाहेर येण्यासाठी उडी मारत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ ८ जुलै रोजीचा असल्याचे समोर आले आहे.https://x.com/330Kanth41161/status/1810360513165144294
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक भांड्यात पिवळी चटणी ठेवली आहे. त्यामध्ये एक लहान उंदीर तरंगताना दिसत आहे. उंदीर भांड्यातून बाहेर येण्यासाठी उड्या मारतोय.