Monday, March 4, 2024

रेशनकार्डधारकांसाठी पुन्हा ‘गोड बातमी’; घरकुलासाठीही अधिकचे ५० हजार

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे- फडणवीस- पवार सरकारने महत्वाचे निर्णय घेतले. यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रेशनकार्ड धारकांसाठी पन्हा एकदा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे, तर पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान रु.५० हजारांवरून वरुन रु. एक लाखांपर्यंत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या मंत्रिमंडळ बैठकीत शासकिय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित करण्यात आलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांच्याकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Related Articles

1 COMMENT

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles