Saturday, October 5, 2024

1 जानेवारीपासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप

राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षांपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. एक जानेवारी 2024 पासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप होणार आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील संपावर असणार आहेत. त्यामुळे येत्या 1 जानेवारीपासून पुण्यासह महाराष्ट्रातील रेशनदुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत.

राज्यात सुमारे 53 हजार रास्त भाव दुकानदार आहेत. त्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन असल्याची टीका महासंघाकडून करण्यात आली. आंदोलन आणि मोर्चाची सरकारकडून दखल घेतली नाही. महासंघाच्या निवेदनाची दखल घेत सरकारने सचिवांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात केवळ आश्वासने देण्यात आल्याचेही महासंघाकडून सांगितलं. सरकारकडून कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे महासंघाच्यावतीने नाईलाजास्तव ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने एक जानेवारीपासून पुकारलेल्या संपात सहभाग होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे.
रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी 50 हजार करा

मार्जिन मनी ३०० रुपये करा

टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या

कालबाह्य नियम बदला

आनंदाचा शिधा कायमस्वरुपी राबवून कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा, यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles