Monday, September 16, 2024

रेशनिंगच्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ मिक्स? अखेर समोर आलं सत्य…व्हिडिओ

अलीकडे रेशनिंगवर मिळणाऱ्या तांदळात प्लास्टिकसदृश तांदूळ मिळत असल्याची तक्रार अनेक लोक करत आहेत. यामुळे रेशनिंगवर निकृष्ट दर्जाचे तांदूळ मिळतात, असा समज अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे हा रेशनिंगवरील तांदूळ खावा की नाही याबाबतही लोक प्रश्न विचारू लागले आहेत. जर तुम्हालाही रेशनिंगच्या तांदळात असे तांदूळ आढळले तर काळजी करू नका. कारण ते प्लास्टिकचे नाही तर तो फोर्टिफाईड अर्थात पौष्टिक तांदूळ आहे. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने रेशनिंगवर मिळालेल्या तांदळातून फोर्टिफाईड अर्थात पौष्टिक तांदूळ बाजूला केलेत. पण, या व्यक्तीलाही फोर्टिफाईड तांदळांबद्दल माहिती नसल्याने तोही संभ्रमात आहे. यात तो सांगतोय की, हे तांदूळ शिजवल्यानंतर त्याचे बारीक पीठ होते, त्यामुळे हा तांदळाचा कोणता प्रकार आहे, नक्की तांदूळच आहेत की दुसरं काही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण, घाबरू नका, हा खाण्यायोग्य असाच तांदूळ आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles