राम मंदिराच्या उद्घाटनामुळे देशभरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. याच पार्श्नभूमीवर श्री राम यांचं चित्र असलेली ५०० रुपयांची एक नोट व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की ही नोट रिझर्व बँकेनं जाहिर केली असून लवकरच ती वापरात येईल.भारतीय नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं चित्र असतं. पण व्हायरल होत असलेल्या या नोटेवर गांधींऐवजी श्री राम यांचं चित्र आहे. व दुसऱ्या बाजूस राम मंदिराचं चित्र आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रामाचं चित्र सोडलं तर ही नोट हुबेहुब खऱ्याखुऱ्या नोटेसारखी दिसतेय. पण खरं सांगायचं झालं तर RBI नं अशी कुठलीही नोट बाजारात आणलेली नाही. RBI नं याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे ही नोट खोटी आहे. शिवाय व्हायरल मेसेजद्वारे केला जाणारा दावा देखील खोटा आहे. त्यामुळे अशा कुठल्याही फॉरवर्डेड मेसेवर विश्वास ठेवू नका.