आरबीआयच्या कार्यालयात खिलाफत इंडियाच्या ईमेलवरून बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. खिलाफत इंडियाच्या मेलवरून आरबीआय कार्यालयासहित एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेतही बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. या धमकी सत्रानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, ‘खिलाफत इंडिया’ने आरबीआयच्या कार्यालय उडवून देण्याची धमकी दिली आहे. खिलाफत इंडियाने इमेलमध्ये आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकसहित ११ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या इमेलमध्ये आरबीआयचे गवर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजता बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याची धमकी इमेलमध्ये दिली होती.
खिलाफत इंडियाच्या धमकीनंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. पोलिसांच्या शोधमोहिमेत सर्व ठिकाणी आक्षेपार्ह आढळून आला नाही. या धमकी प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.