सर्वात आधी एक ईडली घेतली. त्यावर चटणी आणि सांबर टाकलं. मग या तिन्ही गोष्टी छान एकजीव करून घेतल्या. त्यानंतर या मिश्रणात मिल्कमेड, फ्रेश क्रिम आणि थोडं दूध टाकलं. आणि शेवटी हे सर्व मिश्रण बर्फाच्या लादीवर पसरवून गोठवलं आणि मग त्यांचे छान रोल तयार केले. हे आईस्क्रिम खोबऱ्याच्या चटणीसोबत ग्राहकांना खायला दिले. या आईस्क्रिमचा व्हिडीओ foodb_unk या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ५ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास सर्वांनीच या अजब पदार्थावर जोरदार टीका केली आहे. कोणी म्हणतेय, “या रेसिपीसाठी गरूड पुराणात वेगळी शिक्षा आहे.” तर कोणी म्हणतेय, “देवा आता अवतार घेण्याची वेळ आली आहे.
- Advertisement -