भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. यामध्ये GDS/ शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर, डाक सेवक असा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे तब्बल ४४,२२८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या नोकरीसाठी अर्ज करावा.
केंद्र सरकारअंतर्गत ही भरती सुरु आहे. पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. १० वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीमध्ये निवड झाल्यास उमेदवाराला १२,००० ते २९,३८० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.या नोकरीसाठीची जाहिरात पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. १५ जुलैपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.१८ ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. संपूर्ण भारतात या नोकरीसाठी अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. या नोकरीसाठी उमेदवाराला संगणकाचे ज्ञान आणि सायकल चालवता याला हवी. दहावीला मिळालेल्या मार्क्सच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे.१५ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर कागदपत्रे पडताळणी केली जाईल. यात दहावीची मार्कशीट, ओळखपत्र, जन्मातारीख पुरावा सादर करण्यास सांगतील.
Indian post
Mustakim
arbajshaikh8349@gmail.com