मुंबई : बँकींग परीक्षा, पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षांच्या तयारीत ते स्वत:ला झोकून देऊन प्रयत्न करतात. या सर्व उमेदवारांना आता बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक पदाच्या 50 जागांसाठी जाहिरात निघाली आहे. त्यामुळे, इच्छुक व शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करता येईल.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक पदासाठी आरक्षण निहाय जागांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. एकूण 50 जागांसाठी ही भरती निघाली असून मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेल्या उमेदवाराला या नोकरीसाठी अर्ज करता येईल. त्यासाठी, वयोमर्यादा किमान 20 आणि कमाल 28 ठेवण्यात आली आहे. 1 एप्रिल 2024 रोजीच्या तारखेला अनुसरुन उमेदवाराचे वय ग्राह्य धरले जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 24 हजार ते 65 हजार रुपयांपर्यंतच वेतन मिळणार आहे. यासाठी अर्ज करण्यास आजपासून सुरुवात झाली असून शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 ही आहे.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात
आरक्षणनिहाय रिक्त जागांची वर्गवारी
SC: 4 पदे
ST: 5 पदे
OBC: 13 पदे
EWS: 05 पदे
सर्वसाधारण: 23 पदे
एकूण पदे – 50
मासिक वेतन
दरमहा 24,050-64,480 रुपये
परीक्षा शुल्क
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु 750
राखीव वर्ग – मोफत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2024
असा करा अर्ज
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.in भेट द्या
होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा.
स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ उघडेल.
तुमचा नोंदणी फॉर्म येथे भरा.
फी भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
फॉर्म सबमिट करा.
त्याची प्रिंट आऊट घेऊन ठेवा.
ऑनलाईन अर्जसाठी लिंक – https://sbi.co.in/
Need job for better career
8432996588
8432996588
We need this job for better career and more information about banking
Better job