महाराष्ट्र होमगार्ड संघटनेअंतर्गत मोठी भरती होणार आहे. ३४ जिल्ह्यातील एकूण ९७०० होमगार्ड पदे भरली जाणार आहे. यासाठी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावी पास उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहेत. राज्यात होमगार्ड पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
होमगार्ड जवान या पदासाठी ९७०० जागा रिक्त आहेत. २० ते ५० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.शारिरीक विकलांग आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकत नाही.१६ ऑगस्ट २०२४ पासून या भरतीची सुरुवात होणार आहे. होमगार्ड नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.या नोकरीसाठी शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणी आणि कागदपत्रे पडताळणी केली जाईल.
या नोकरीसाठी उमेदवार ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे त्याच जिल्ह्यात नोकरी मिळणार आहे.त्यामुळे उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करणे गरजेचे नाही. याबाबत अर्ज प्रक्रिया १६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.याचसोबत सध्या बीएसएफमध्ये पॅरामेडिकलमध्ये नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी २५ जुलै २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. १०वी आणि १२ वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारिरीक चाचणीद्वारे घेतली जाईल.