राज्यात बेरोजगारी मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. प्रत्येक तरुण हाताला काम शोधत आहेत. मात्र नोकरी नसल्याने अनेक तरुण आता हतबल झाले आहेत. अशात सोशल मीडियावर एका मोठ्या भरतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून काहींना हसू येईल तर काहींना खरोखर रोजगार मिळेल.
व्हिडीओमध्ये भरतीबाबत एका तरुणीने माहिती दिली आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळा सुरू झाली की, गावी सर्वत्र शेतीची पेरणी सुरू होते. त्यात भाताची शेती करताना सुरुवातीला पेरणी करावी लागते. तर हा महिना पेरणीचा आहे. या महिन्यात सर्वत्र तांदूळ लावले जातात.
आता बेरोजगार तरुणांसाठी एका तरुणीने व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. यामध्ये ही तरुणी स्वतः देखील शेतात काम करत आहे. यामध्ये तिने मजेशीर अंदाजात सांगितलं आहे की, या कामासाठी कोणत्याही शिक्षणाची अट नाही. तसेच यासाठी कोणतीही शारीरिक चाचणी देखील द्यायची गरज नाही. येथे काम केल्यावर लगेचच रात्री तुमच्या हातात तुमच्या कामाचे पैसे मिळणार असं सुद्धा या तरुणीने सांगितलं आहे.
`