Wednesday, April 17, 2024

भाजपच्या विद्यमान दोन खासदारांचा लोकसभा निवडणुक लढवण्यास नकार

गौतम गंभीरनंतर भाजपच्या अजून एका खासदाराने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलीय. हजारी बागमधील भाजपचे खासदार जयंत सिन्हा यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलंय. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे विनंती केलीय. त्यांना सर्व निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावे, अशी विनंती जयंत सिन्हा यांनी नड्डा यांच्याकडे केलीय. दरम्यान आज सकाळी पूर्व दिल्लीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनीही आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय
आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं जयंत सिन्हा यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितलंय. आपल्याला भारतात आणि जगभरातील जागतिक हवामान बदलाचा सामना करण्यासाठी काम करायचे आहे. यामुळे पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावे, अशी विनंती केल्याचं जयंत सिन्हा यांनी पोस्टद्वारे सांगितलंय. सिन्हा सध्या हजारीबाग लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना विनंती करताना जयंत सिन्हा म्हणाले की, ते पुढेही पक्षासाठी काम करत राहतील. मागील १० वर्षापासून आपण हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून जनतेची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. पुढेही आपण लोकसेवा करत राहू असं जयंत सिन्हा म्हणालेत. यापुढे आपण आर्थिक आणि शासनासंबंधीच्या मुद्द्यावर पक्षासोबत राहू. जनतेची सेवा करण्यासाठी आपल्याला संधी दिली त्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचं आभार मानले.यापूर्वी पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना राजकीय जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती.
mm

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles