जिल्ह्यातील 41 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार जाहीर. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरस्कार प्राप्त; प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव जाळी जिल्ह्यात प्रथम
महात्मा गांधी जयंती दिवशी 2 ऑक्टोबर 2014 रोजी देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरवात झाली. नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणामध्ये आरोग्य सुविधा मिळाव्यात व आरोग्य संस्थांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सातत्य ठेवावे यासाठी कायाकल्प पुरस्कार योजना राबविण्यात येते.
शासनाकडुन सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रण पध्दतींना प्रोत्साहन देण्यासाठी कायाकल्प पुरस्कार योजनेअंतर्गत आरोग्य संस्थांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट उपाययोजना आधारावर पुरस्कृत करण्यात येते. यामध्ये निर्धारीत मानक पुर्ण करणा-या आरोग्य संस्थांना रोख रकमेचे पुरस्कार देण्यात येतात.
अहमदनगर जिल्ह्यातील खालील 41 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे मुल्यांकन हे राज्य स्तरावरुन निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार व राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राद्वारे तयार चेकलिस्ट प्रमाणे करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे.
राज्यातील 580 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक 41 प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव जाळी या आरोग्य संस्थेस जिल्हांतर्गत प्रथम पुरस्कार मिळवला आहे. 2 लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
तसेच अहमदनगर जिल्ह्यातील खालील 40 प्राथमिक आरोग्य केंद्रांनी चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना सुध्दा प्रोत्साहनपर पुरस्कार घोषित झाले आहे. प्रोत्साहन पर पुरस्कार रक्कम प्रती प्राथमिक आरोग्य केंद्र रु.50 हजार आहे.
अं.क्र. तालुका प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव एकुण प्राथमिक आरोग्य केंद्र
१ नगर चास, रुईछ्त्तीसी, वाळकी, देहरे 04
2 पारनेर कान्हुर पठार, खडकवाडी, निघोज, रुई छत्रपती, पळवे खु. 05
3 राहुरी उंबरे, मांजरी 02
4 संगमनेर बोटा, निमगाव जाळी 02
अं.क्र. तालुका प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव एकुण प्राथमिक आरोग्य केंद्र
5 श्रीगोंदा लोणी व्यंकनाथ, आढळगाव 02
6 श्रीरामपुर निमगाव खैरी 01
7 अकोले ब्राम्हणवाडा, विठा, खिरविरे ०३
8 नेवासा उस्थळ दुमाला, नेवासा बु. 02
9 पाथर्डी खरवंडी कासार, तिसगाव, मिरी ०३
10 राहाता कोल्हार बु., दाढ बु., सावळी विहीर, अस्तगाव 04
11 कर्जत कुळधरण, राशीन ०२
12 शेवगाव दहिगावने,शेवगाव (घोटण), हातगाव नगर, भातकुडगाव,ढोरजलगावशे 05
13 जामखेड अरणगाव, नान्नज, खर्डा 03
14 कोपरगाव टाकळी ब्राम्हणगाव, पोहेगाव 02
प्रा. आ. केंद्रांना वितरीत करण्यात आलेल्या रकमेतील 75% रक्कम आरोग्य संस्थाच्या बळकटीकरणासाठी व 25 % रक्कम अधिकारी व कर्मचा-यांसाठी संस्था अंतर्गत आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीचा विनियोग मार्गदर्शक सुचनांनुसार प्रमाणे करण्यात येणार आहे. सदर योजना प्रा आ केंद्रामध्ये विविध उपक्रम राबविनेसाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अहमदनगर श्री. आशिष येरेकर, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी, डॉ विनोद काकडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, श्री विजय गायकवाड, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समिती समन्वयक, डॉ अमृता यांनी मार्गदर्शन केले.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अहमदनगर श्री. आशिष येरेकर, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, यांनी जिल्हातरीय अधिकारी व पुरस्कार प्राप्त सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले आहे. लवकरच संबंधित संस्थांना जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये पुरस्कार वितरीत करण्यात येतील.
(डॉ. बापूसाहेब नागरगोजे)
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद अहमदनगर