Tuesday, September 17, 2024

कुक्कुटपालन व्यवसायिकांना मोठा दिलासा, पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायती मार्फत एकसमान कर आकारणी

कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसायिकांना पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायती मार्फत आकारण्यात येणारी कर आकारणी एकसमान करण्याच्या सूचना महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

वेगवेगळ्या ग्रामपंचायती मध्ये वेगवेगळा कर आकारला जात असल्याने शेतकरी आणि कुक्कुटपालन व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता. यासंदर्भात कुक्कुटपालन व्यवसायिकांनी महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेवून आपल्या अडचणी मांडल्या होत्या.

आज मंत्रालयात मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत कर आकारणीतील विसंगती दुर करून एकसमान कर आकराणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे कुक्कुटपालन व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, कुक्कुटपालन व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय असून यामुळे शेतकऱ्यांकरीत अर्थिक स्त्रोत आहे. या व्यवसायामुळे शेतकर्यांच्या अर्थिक विकासास मदत होईल.यामुळे सर्व ठिकाणी एकसमान कर आकारणी झाल्यास कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्यांनाा आधार देण्यासाठी एकसमान कर आकारणी होणे आवश्यक असल्याचे मत मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले.

या बैठकीला अपर मुख्य सचिव राजेश कुमार, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ ढवले, पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर उपसचिव श्री मराळे यासह कुक्कुटपालन शेतकरी प्रतिनिधी, महसूल , ग्रामविकास, पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील म्हणाले, कुक्कुटपालन व्यवसायासाठी स्वतःच्या शेतात उभारण्यात आलेल्या पोल्ट्री शेड साठी राज्यातील संबंधित विविध ग्रामपंचायती मार्फत वेगवेगळी कर आकारणी होत असल्याचे कुक्कुटपालन पालन व्यवसायिकांच्या मागणीवर योग्य निर्णय घेण्यात येईल. शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी प्रोत्साहित करणे व शेतीपूरक व्यवसाय असल्याने कुक्कुटपालनास प्रोत्साहन देण्या बरोबरच कुक्कुटपालन व्यवसायातील मोठे उद्योग हे सुसज्य व्यवसाय करीत असल्याने त्यांच्याशी शेतकरी करत असलेल्या पोल्ट्री व्यवसायाची तुलना करता येत नसल्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

शेतकऱ्यांनी उभारलेल्या पोल्ट्री शेड साठी मालमत्ता कराची आकारणी माफक पद्धतीने करण्याबाबत विचार करून राज्यातील सर्व ठिकाणी एकच पद्धतीने कर आकारणी व्हावी. पशु संवर्धन विभागाच्या वतीने यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून ग्रामविकास विभागास पाठवावा. यामध्ये सुसूत्रता येण्यासाठी ग्रामविकास विभागाने कार्यवाही करावी असे मंत्री विखे पाटील म्हणाले. याप्रसंगी त्यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत पोल्ट्री शेड कर आकारणीतील विसंगतीबाबत दूरध्वनीवरून त्यांनी चर्चा केली.

याप्रसंगी बैठकीमध्ये शासनाने सुचित केलेले दर हे प्रति स्क्वेअर फुट 35 ते 75 पैसे पर्यंत आकारण्याची तरतूद केलेली आहे. पोल्ट्री व्यवसायासाठी लागणारे फीड्स व खाद्य यासाठी सुसज्य पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. कुक्कुटपालनातील अडचणीवर मात करून शेतकऱ्यांना व्यावहारिक दृष्टीने सक्षम करणे गरजेचे आहे. पोल्ट्री शेड वर सोलर पॅनल उभारून वीज निर्मितीसाठी केली जावी. यासह शासनाकडून विविध उपाययोजना करण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्त यांची समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles