नगर-अश्लिल फोटो व्हायरल करण्याची तसेच कुटुंबियांना मारून टाकण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार करणारा आरोपी गणेश रावसाहेब धरम (रा.मोहिनीनगर, केडगाव) यास कोतवाली पोलिसांनी गुरुवारी (दि.८) पकडले आहे.सदर गुन्हा ५ फेब्रुवारी रोजी दाखल झालेला होता. तेव्हापासून आरोपी फरार होता. याबाबत पुण्यातील कात्रज परिसरातील जाधवनगर येथे राहणाऱ्या महिलेने फिर्याद दिली होती.
आरोपी गणेश धरम याने त्या महिलेला धमकावत ३० नोव्हेंबर २०२३ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वारंवार तिच्यावर अत्याचार केला होता. तसेच त्याचे वडील रावसाहेब माधव धरम याने ही त्या महिलेशी अश्लील वर्तन केले होते.गुन्हा दाखल झाल्यावर रावसाहेब धरम याला पोलिसांनी अटक केली होती मात्र गणेश हा फरार होता. कोतवालीचे पो.नि. प्रताप दराडे यांना गुरुवारी (दि.८) गोपनीय माहिती मिळाली की सदर फरार आरोपी हा कल्याणरोड परिसरात फिरत आहे.
ही माहिती मिळताच त्यांनी पोलिस पथकाला कारवाई साठी पाठविले. स.पो.नि. प्रविण काळे व गुन्हे शोध पथकातील पो. हे. को. विशाल दळवी, मोहन भेटे, नकुल टिपरे, रियाज इनामदार, पो. कॉ. दिपया रोहकले, तानाजी पवार, सत्यम शिदे,सुजय हिवाळे, सचिन लोळगे, सुरज कदम, अनुप झाडबुके यांनी त्याला कल्याण रोड, बायपास चौक येथे पकडले आहे. पोलिसांच्या या कार्यवाहीचे नागरिकांतून कौतुक होत आहे. या आरोपीने महिलेला धमकावत वारंवार तिच्यावर अत्याचार केला होता.तसेच त्याचे वडील रावसाहेब माधव धरम याने ही त्या महिलेशी अश्लील वर्तन केले होते. आता आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.