नगर : प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच भिम आर्मी बहुजन एकता मिशनच्या वतीने येत्या १३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असून दोन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी तसे लेखी पत्र आ. नीलेश लंके यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
भिम आर्मी बहुजन एकता मिशनचे जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नगर दक्षिण विभागाचे बन्सी घंगाळे यांनी नीलेश लंके यांना पाठींब्याचे पत्र सुपूर्द केले.
रिपब्लिक पार्टीचे अध्यक्ष बन्सी घंंगाळे यांनी दिलेल्या पत्रामध्ये नमुद करण्यात आले आहे की, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सुधाकर रोहम यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी येथे बैठक होउन या बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांनी या निर्णयास पाठींबा दर्शविला असल्याचे घंगाळे यांनी पत्रात नमुद केेले आहे.
भिम आर्मी बहुजन एकता मिशनचे भिंगारदिवे यांनी सांगितले की, आमच्या पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा देण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता पोळ तसेच महिला आघाडी अध्यक्ष निताताई अडसुळे यांनी घेतला आहे. वरीष्ठ पदाधिकऱ्यांच्या आदेशानुसार नगर दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश ज्ञानदेव लंके यांना पक्षाच्या वतीने पाठींबा जाहिर करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत आरोळे, सनी भिंगारदिवे, सचिन राजापुरे, शुभम माने, अतुल भिंगारदिवे हे उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी, भिम आर्मी एकता मिशनचा नीलेश लंकेंना पाठींबा
- Advertisement -