विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. सोळा पोलीस निरीक्षकांसह अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दहा पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी संध्याकाळी बदल्यांचे हे आदेश काढले.
नव्या बदल्यांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेला नवे पोलीस निरीक्षक मिळाले असून या शाखेचा पदभार आता नितीन चव्हाण यांच्याकडे सोपविला जाणार आहे. तर जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेल्या आणि अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या उपोषणानंतर चर्चेत आलेल्या एलसीबीमध्ये (स्थानिक गुन्हे शाखा) मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फेरबदलांमध्ये या शाखेत बदल होण्याची चिन्हे होती, मात्र या शाखेचा कार्यभार अद्यापही पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडेच आहे. तर नव्या फेरबदलात सायबर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस दलातील नवे फेरबदल…
पोलीस निरीक्षक समाधान चंद्रभान नागरे यांची बदली अहमदनगर नियंत्रण कक्षातून शेवगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक दिगंबर हरी भदाणे यांची बदली शेवगाव पोलीस ठाण्यातून घारगाव (संगमनेर) पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष बाबुराव खेडकर यांची बदली जिल्हा विशेष शाखेत करण्यात आली आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान हरिभाऊ मथुरे यांची बदली कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक बापूसाहेब शांताराम महाजन संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक असतील.
भरोसा सेलचे पोलीस निरीक्षक दौलत शिवराम जाधव जिल्हा विशेष शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहतील.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप बाळासाहेब देशमुख यांची बदली शिर्डीच्या वाहतूक नियंत्रण शाखेत करण्यात आली आहे.
शिर्डी वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस निरीक्षक राजेंद्र जगन्नाथ इंगळे यांची बदली ए. एच. टी. यु. अहमदनगर या शाखेकडे करण्यात आली आहे.
तर ए. एच. टी. यु. शाखेतील पोलीस निरीक्षक नंदकुमार विष्णू दुधाळ यांची बदली पोलीस अधीक्षकांचे वाचक पोलीस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर लक्ष्मण पेंदाम यांची बदली सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांची बदली अहमदनगर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे करण्यात आली.
पोलीस अधीक्षकांचे वाचक पोलीस निरीक्षक असलेले पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्याकडे आता अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेचा कार्यभार देण्यात आला आहे.
नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक मोहन बोरसे अकोले पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक असतील.
नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक किरण शिंदे श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक असतील.
अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव राजाराम पाटील यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांची देखील बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पुढील प्रमाणे…
पाथर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांची बदली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील सहाय्य पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
सोनई पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष परशराम शेळके यांची बदली कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कर्जत पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय श्रीकृष्ण माळी यांची बदली सोनई पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सुरेश सपकाळे यांची बदली अहमदनगरच्या अर्ज शाखेकडे करण्यात आली आहे.
जिल्ह्यात नव्याने आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रमीज हजरत मुलाणी यांना कर्जत पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली.
जळगाव येथून बदलून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश निवृत्ती गोंटला यांना जामखेड पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली.
नंदुरबार येथून बदलून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांची बदली उपविभागीय पोलीस अधीक्षक शिर्डी यांच्याकडे वाचक म्हणून करण्यात आली आहे.
नगरच्या टीएमसीत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांची बदली नगरच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे बदली करण्यात आली.
शिर्डी पोलीस ठाण्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे यांची बदली शिर्डीच्या वाहतूक नियंत्रण शाखेकडे करण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश आसाराम दाभाडे यांची बदली संगमनेर पोलीस उपाधीक्षक कार्यालयात करण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या पुढील प्रमाणे…
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे यांची बदली लोणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
लोणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले योगेश बाबासाहेब शिंदे यांची बदली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात करण्यात आली.
नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम रामचंद्र पवार यांची बदली बेलवंडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
ए. एच. टी. यु. शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रियंका दादासाहेब आठरे यांची बदली नगरच्या भरोसा सेलमध्ये करण्यात आली आहे.
नक्षल सेलमध्ये नियुक्ती झालेले मात्र संगमनेर शहर पोलीस, पोलीस उपाधीक्षक कार्यालय, घारगाव पोलीस ठाणे येथेच कार्यरत असलेले निवांत जाधव आता शनिशिंगणापूर मंदिरामध्ये व्हीआयपींचा प्रोटोकॉल सांभाळतील.
नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांची बदली टी.एम.सी.मध्ये करण्यात आली आहे.
नाशिक येथून बदलून आलेले पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांना नगरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे.
नाशिक येथून बदलून आलेले उपनिरीक्षक दीपक शेषराव पाठक यांना शेवगाव येथे पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे.
नाशिक येथून बदलून आलेले पोलीस उपनिरीक्षक सतीश डौले यांना श्रीरामपूर पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयात नियुक्ती देण्यात आली.
नाशिक येथून बदलून आलेले उपनिरीक्षक योगेश चाहेर यांना सायबर पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली.