Saturday, December 9, 2023

‘तुम्ही राजीनामा द्या’ …. महिला सरपंचाला सदस्याकडून कार्यालयात मारहाण

नाशिकरोड येथून जवळच असलेल्या पळसे ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाला महिला सदस्याने राजीनामा देण्याच्या कारणावरून मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. याबाबत महिला सरपंचणे नाशिकरोड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे नाशिक जिल्ह्यातील पळसे ग्रामपंचायतीची निवडणूक अडीच वर्षापूर्वी पार पडली. या निवडणुकीत विष्णू गायखे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या परिवर्तन पॅनलने १७ पैकी १२ जागांवर विजय मिळवला, तर जगन आगळे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विकास पॅनलने पाच जागा जिंकल्या. राजकीय खलबते होऊन परिवर्तन पॅनलच्या प्रिया दिलीप गायधनी, ताराबाई होणाजी गायधनी यासह तीन सदस्यांनी विकास पॅनलला समर्थन देत सत्ता स्थापनेचा दावा केला होता.
दरम्यान आज सकाळी सरपंच प्रिया गायधनी या ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत असताना महिला सदस्य ताराबाई होणाजी गायधनी यांनी कार्यालयात आल्या. यावेळी त्यांनी ‘तुम्ही राजीनामा द्या’ या कारणावरून वाद घालत सरपंच प्रिया गायधनी यांना मारहाण केली. यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात मोठा गदारोळ झाला. काही ग्रामस्थ व सरपंच यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या घटनेमुळे शहर व जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d