Sunday, December 8, 2024

आई व बहीणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी ,नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा ठराव

नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामसभेने आई व बहीणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घातली आहे. तरीही जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतकडून 500 रुपये दंड सक्तीने आकारण्यात येईल, असे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले.
सौंदाळाच्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. शिव्या देण्यावर बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान करण्यात येत आहे, असे सरपंच शरद आरगडे यांनी म्हटले आहे.यावेळी बालकामगार बंदीचा ठराव घेण्यात आला. बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी बालकामगार दाखवा एक हजार रुपये मिळवा असे स्लोगन ठरवून बालकामगार निदर्शनास आल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडे आणून द्यावा त्या व्यक्तीस एक हजार रुपये बक्षीस दिले जाईल, असे ठरले. गावामध्ये बालविवाह शंभर टक्के बंदी करण्यात आलेले आहे. गावात कुणीही बालविवाह करू नये. केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही ग्रामसभेत ठरले. सोशल मीडियाच्या मोबाईलमुळे शालेय विद्यार्थी अभ्यास करत नसल्याचे निदर्शनास आल्याने यापुढे संध्याकाळी 7 ते 9 यावेळेत घरातील शालेय विद्यार्थ्याकडे मोबाईल द्यायचा नाही असाही ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. या सर्व ठरावांची सूचना सरपंच शरद आरगडे यांनी मांडली व अनुमोदन गणेश आरगडे यांनी दिले.

यावेळी उपसरपंच कोमल आरगडे, सदस्य मंगल ज्ञानदेव आरगडे, छाया मिनीनाथ आरगडे, भीमराज आढागळे, सुधीर आरगडे, बाळासाहेब आरगडे, चंद्रकांत आरगडे, मंजू आढागळे, माजी सरपंच प्रियंका आरगडे, उषा बोधक, मंगल बोधक, रंजना बोधक, अश्विनी आढागळे, कावेरी आढागळे, ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांसह पुरुष हजर होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles