एक मनाला चटका लावणारा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये एका योगा केंद्रात देशभक्तीपर कार्यक्रमात एका निवृत्त भारतीय जवान आनंदाने नाचत होता. मात्र, नाचता नाचता ते जमिनीवर कोसळले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. योगा केंद्रात लोकांसमोर हातात तिरंगा घेऊन नाचत असताना त्यांना मृत्यूने गाठले; पण बराच वेळ ही सगळ्यांना सुन्न करून टाकणारी बाब कुणाच्या लक्षातही येत नाही. मन हेलावणाऱ्या या घटनेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://x.com/huzaifakhan1997/status/1796495631739220087
या व्हिडीओमध्ये एक निवृत्त भारतीय जवान हातात तिरंगा घेऊन रंगमंचावर आपली अदाकारी सादर करताना दिसत आहे. अचानक रंगमंचावरच त्यांना हृदयविकाराचा झटका येतो आणि ते तेथेच अडखळत खाली कोसळतात. त्यांच्या हातातून तिरंगा पडतो; पण लोक हा त्यांच्या अदाकारीचा भाग मानून टाळ्या वाजवत राहतात. बराच वेळ ते रंगमंचावर तसेच पडून राहतात तेव्हा लोकांना सत्य समजते.
व्हिडिओ स्टेजवर तिरंगा हातात असताना जवानाचा मृत्यु…प्रेक्षकांना कळलंच नाही..टाळ्या चालूच राहिल्या..
- Advertisement -