काही मिठाई अशा आहेत ज्या फार महाग नसतात पण लोकांना त्या खायला आवडतात. त्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. अशीच एक मिठाई म्हणजे रेवडी. जी प्रसाद म्हणून दिली जाते आणि सहज आवडीने खाल्ली देखील जाते कारण त्याची चव चांगली असते. मात्र, आज आम्ही तुम्हाला कारखान्यात रेवडी कशाप्रकारे तयार केली जाते याची संपूर्ण प्रक्रिया दाखवणार आहोत. हे पाहिल्यानंतर कदाचित तुम्ही पुन्हा रेवडी खाऊ शकणार नाही.
रेवडी कशी बनते याकडे तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? तीळ आणि गुळाची रेवडी असो की साखरेच्या पाकातील रेवडी असो. सर्व रेवड्या एकत्रितपणेच तयार केला जातात. अखेर एवढ्या रेवड्या कशा तयार होतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता. सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सुरुवात साखरेचा पाक बनवण्यापासून होते. एकदा ते घट्ट झाले की, एक माणूस हातमोजे न घालता ते बाहेर काढताना दिसतो. मग कामगारांचा एक गट साखरेच्या पाकाचे लहान तुकडे करतो आणि सपाट गोल वड्या बनवतो. व्हिडिओ जसजसा पुढे जाईल तसतसे तीळ एका घाणेरड्या तव्यात भाजून त्यात रेवडी घोळली जाते. शेवटी एका छोट्याशा गोलाकार ताटावर एक व्यक्ती उभी असून जमिनीवर ठेवलेल्या रेवडीवर दाब देताना दिसते. नंतर या रेवड्या जळत्या निखाऱ्यावर (कोशळ्यावर) भाजल्या जातात.. हा व्हिडीओ पाहून रेवडी किती अस्वच्छ पद्धतीने तयार केली जाते हे स्पष्ट होते. हे सर्व दृश्य पाहून तुम्हाला कदाचित धक्का बसू शकतो