वाळू वाहतूक वाहनांचे सुधारित दर जाहीर
अहमदनगर, दि.१८ जूलै २०२४ – वाळू डेपोपासून ते ग्राहकांपर्यंत स्वस्त दरात वाळू पोहोचविण्यासाठी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सुधारित भाडे दर निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक परिवहन प्राधिकरण त्रिस्तरीय समितीने अहमदनगर जिल्ह्यासाठी हे सुधारित दर निश्चित केले आहेत. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीत सदस्य पोलीस अधीक्षक व सचिव म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी हे कार्यरत आहेत. या समितीने वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे वाहन प्रकारानुसार प्रतिकिलो मीटरनुसार दर ठरविले आहेत. सुधारित दर खालीलप्रमाणे आहेत. हलके मालवाहू वाहन (१.५ टन पर्यंत) – ३१ रूपये, (१.५ टन ते ३.५ टन पर्यंत)- ३५.५ रूपये, (३.५ ते ७.५ टनपर्यंत) – ३८ रूपये दर आहे. तर मध्यम मालवाहू वाहन (७.५ टन ते १३ टनपर्यंत) – ४८ रूपये, जड मालवाहू वाहन (१३ टन ते १८.५ टन पर्यंत ) – ५६ रूपये, जड मालवाहू वाहन (१८.५ टन ते २८ टन पर्यंत)-६४ रूपये व जड मालवाहू वाहन (२८ टन ते ३५ टन पर्यंत)- ६८.५ असे सुधारित दर जाहिर केले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहमदनगर व श्रीरामपूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.