अनावश्यक खर्च टाळण्यासाठी, नवीन बोधचिन्ह तयार करण्याचा निर्णय रद्द करा
नगरः महानगरपालिकेचे सध्या अस्तित्वात असलेले बोधचिन्ह बदलण्याची आवश्यकता नाही. कारण राज्य शासनाने केवळ अहमदनगर महानगरपालिकेचे नामांतर अहिल्यानगर महानगरपालिका असे करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
2003 साली महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन जेष्ठ पत्रकार व तज्ञांच्या समितीने सध्या अस्तित्वात असलेल्या बोधचिन्हाची निवड केलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या सध्या वापरात असलेल्या बोधचिन्हमध्ये फक्त नावाचा बदल करून आहे तेच बोधचिन्ह वापरण्यात यावे.
प्रस्तावित बोधचिन्हपेक्षा सध्या अस्तित्वात असलेले बोधचिन्ह हे अतिशय ठळक व स्पष्ट असून त्यामध्ये फक्त नावाचा बदल करून त्याचा नमुना या पत्रासोबत जोडत आहे.
महानगरपालिकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता नवीन बोधचिन्ह तयार करण्यासाठीचा अनावश्यक खर्च टाळून नव्याने बोधचिन्ह तयार करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा.
अशी मागणी अभय ललवाणी यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पत्रामध्ये नावात बदल केलेल्या सुधारीत बोधचिन्हाचा समावेश देखील करण्यात आला आहे.