Friday, February 23, 2024

‘सैराट’ फेम रिंकूचे खरं नाव काय आहे? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

सैराट’ या २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरूने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं होतं. ‘घराघरांत लोकप्रिय झालेल्या रिंकू राजगुरूचं खरं नाव फार कमी लोकांना ठाऊक आहे.रिंकूने नववर्षानिमित्त नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यावेळी अभिनेत्रीने चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली. काही चाहत्यांनी “तुझं टोपणनाव काय आहे?” असा प्रश्न तिला विचारला यावर, अभिनेत्रीने “रिंकू…” असं उत्तर दिलं. साहजिकच टोपणनाव रिंकू आहे हे वाचून अनेकांना तिचं खरं नाव काय आहे? असा प्रश्न पडला.

अभिनेत्रीच्या एका चाहत्याने, “जर तुझं टोपणनाव रिंकू आहे, तर खरं नाव काय आहे?” असा प्रश्न तिला विचारला. यावर तिने प्रेरणा असं उत्तर दिलं. रिंकूचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरू असं आहे. अभिनेत्रीच्या दहावीच्या निकालपत्रावर व शाळेच्या दाखल्यावर प्रेरणा हे तिचं खरं नाव नमूद केलेलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles