सुपर 8 फेरीतील भारताचा पहिलाच सामना अफगाणिस्तानशी झाला. या सामन्यात भारताने 8 गडी गमवून 181 धावा केल्या आणि विजयासाठी 182 धावांचं आव्हान ठेवलं. पण अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 20 षटकात 8 गडी गमवून 134 धावा करू शकला. भारताने हा सामना 47 धावांनी जिंकला.भारताने या सामन्यात गोलंदाजी असो की फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण सर्वच ठिकाणी आपलं सर्वोत्तम प्रदर्शन केलं. मात्र एका ठिकाणी कर्णधार रोहित शर्मा विकेटकीपर ऋषभ पंतवर वैतागलेला दिसला. त्याचं झालं असं की, कुलदीप यादवच्या चेंडूवर गुलबदीन नईबने उत्तुंग फटका मारला. चेंडू खूपच वर चढला होता. हा झेल पकडण्यासाठी ऋषभ पंतने 18 मीटर लांब धाव घेतली आणि पकडला. पण समोर उभ्या असलेल्या कर्णधार रोहित शर्माने या विकेटसाठी सेलिब्रेशन करण्याऐवजी त्याला लांब उभं राहण्यास सांगितलं.
- Advertisement -