Friday, March 28, 2025

Video :रितेश देशमुख ठरला महाराष्ट्राचा फेवरेट दिग्दर्शक,जिनिलीयाचा आनंद गगनात मावेना!

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ या वर्षभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात भरभरून प्रतिसाद मिळाला. २०२२ च्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. नुकत्याच पार पडलेल्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यात देखील ‘वेड’ चित्रपटाचा जलवा पाहायला मिळाला.

‘वेड’ चित्रपटाने एक दोन नव्हे तर तब्बल ९ पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. हा दिग्दर्शक म्हणून रितेशचा पहिला चित्रपट होता, तर त्याची पत्नी जिनिलीयाने ‘वेड’च्या निमित्ताने अभिनेत्री म्हणून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं.‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ सोहळ्याला रितेश-जिनिलीयाने जोडीने उपस्थिती लावली होती. यावेळी रितेशचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मान करण्यात आला. अभिनेता म्हणाला, “पहिली व्यक्ती जिने मला, मी दिग्दर्शक होऊ शकतो असं सांगितलं ती म्हणजे माझी बायको जिनिलीया. त्यामुळे माझा हा दिग्दर्शक म्हणून पहिला पुरस्कार जिनिलीया फक्त तुमच्यासाठी!

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles