रितेशने नुकतीच एक नवीन रील त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात रितेशने सफेद रांगाचा सदरा आणि त्यावर राखाडी रंगाचा कोट परिधान केलाय. तर जिनिलिया काळ्या रंगाच्या नाईट सूटमध्ये दिसतेय. व्हिडीओ सुरू होताच रितेश म्हणतो, “अच्छा तुला काय वाटतं यावेळेस निवडणूक कोण जिंकेल.” यावर मजेशीर प्रतिक्रिया देत जिनिलिया त्याला म्हणते, “अरे कोणीही जिंकूदे, तुमच्यावर तर मीच राज्य करणार आहे.” हे ऐकताच रितेश त्याचे हावभाव बदलतो.
“अब की बार नही… हर बार बीवी की सरकार… निवडणूक २०२४” असं कॅप्शन रितेशने या व्हिडीओला दिलं आहे. रितेश जिनिलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.