जिनिलीया व रितेश देशमुख यांची जोडी मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या या जोडप्याने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.यामध्ये जिनिलीया रितेशला म्हणते, “ऐका आता गाण्याची एक ओळ मी गाते आणि एक ओळ तुम्ही गा” अभिनेता बायकोच्या सांगण्याला अनुमोदन देत मान डोलावतो. यानंतर जिनिलीया शाहरुख-काजोलचं लोकप्रिय “जाती हूँ मैं…” हे गाणं गाते. जिनिलीयाने “जाती हूँ मैं” गायल्यावर पुढे रितेशने “जल्दी है क्या” ही ओळ म्हणणं अपेक्षित असतं. पण, एवढ्यात अभिनेता गाण्याची ओळ ट्विस्ट करत “जल्दी तू जा” असं म्हणतो. यानंतर ऑडिओच्या बॅकग्राऊंडला एकच हशा पिकतो.
- Advertisement -