अभिनेता रितेश देशमुख याच्या घरी दरवर्षीप्रमाणं यंदाही गणेशउत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. दरवर्षीप्रमाणं यंदाही त्याच्या मुलांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. दरवर्षी प्रमाणं यंदाही रितेशनं त्याच्या मुलांसोबत बाप्पाची एक एकोफ्रेंडली मूर्ती साकारली आहे.
रितेशनं एक व्हिडिओ शेअर करत त्याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.मुलांसोबत नेहमीच काही तरी खास करण्याचा रितेश आणि जिनिलियाचा प्रयत्न असतो. यंदा त्यांनी लोखंडांच्या पार्ट्स पासून रिसायकल मूर्ती साकारली आहे. रितेशनं त्याच्या लेकांचा शेअर केलेला व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.