अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. रितेश आणि जिनिलीयाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. २००३ चा ‘तुझे मेरी कसम’ ते २०२२ च्या अखेरिस प्रदर्शित झालेला ‘वेड’ या सगळ्या चित्रपटादरम्यानचे जिनिलीयाबरोबरचे रोमॅंटिक फोटो रितेशने एका व्हिडीओद्वारे शेअर केले आहेत. सगळ्या जुन्या आठवणींचे रोमॅंटिक फोटो अभिनेत्याने एका व्हिडीओद्वारे शेअर केले आहेत. रितेशने या व्हिडीओला “उड दी फिरा…” हे गाणं लावलं असून याला, “आम्ही एकत्र असतो तेव्हा अधिक चांगले दिसतो” असं कॅप्शन दिलं आहे.
- Advertisement -