Ritesh Deshmukh ‘वेड’च्या माध्यमातून मराठी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करून मराठी सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या रितेशला झी टॉकीजतर्फे ‘फेव्हरेट स्टाईल आयकॉन पुरस्कार’ दिला जाईल. ‘वेड’ या मराठीतील हिट सिनेमासाठी महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२२ या पुरस्कारानेही रितेशला गौरवण्यात येणार आहे.
३० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या वेड या सिनेमातून त्याने दिग्दर्शनात टाकलेलं पहिलं पाऊल. आणखी एक बाब म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणाऱ्या जिनिलिया देशमुखचा हा पहिलाच मराठी सिनेमा होता.






