Tuesday, May 28, 2024

तुला शिकवीण चांगलाच धडा…छेड काढणाऱ्याला मुलीने असा तुडवला की…व्हिडिओ

दिवसेंदिवस भररस्त्यात मुलींची छेड काढण्याच्या प्रसंगात वाढ होत आहेत. दिवसाढवळ्या मुलींची छेड काढली जाते. मात्र फार कमी वेळा अशा नराधमांना शिक्षा दिली जाते. बऱ्याचवेळा मुलींची छेड काढून असे आरोपी फरारही होतात. मात्र या शाळकरी मुलींनी कुणाची वाट न हिम्मतीनं छेड काढणाऱ्या तरुणाला जन्माची अद्दल घडवली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी शाळेच्या कपड्यांवर दिसत आहे, तिनं यावेळी छेड काढणाऱ्या तरुणाचे केस धरले असून त्याला चपलेने मारत आहे. रोज रोज अश्लीच भाषेत आवज देणं, कधी गाडीवर बाजूने जात स्पर्श करणं, या सगळ्या प्रकाराला वैतागून तरुणीनं अखेर त्या तरुणाला चांगलाच चोप दिला. ती प्रचंड संतापलेली दिसत असून ती तरुणाला बेदम मारहाण करत आहे. हा सर्व प्रकार शाळेच्या बाहेरच घडला असून आजूबाजूला गर्दी जमल्याचंही व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.https://x.com/gharkekalesh/status/1788957964067274785

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles