सर्व चहांना फिकी पाडेल अशी एक नवी रेसिपी समोर आली आहे. या चहाला ‘रोस्टेड टी’ असं म्हणतात. जणू एखादी मिसळ करावी ना तशी ही चहा तयार केली जाते. या रोस्टेट टीची नवी रेसिपी तुम्ही देखील एकदा पाहाच. सर्वात आधी चहाची पूड आणि साखर भांड्यात छान भाजून घेतली. मग या मिश्रणात वेलची आणि थोडं पाणी मिक्स केलं. मग ही ग्रेव्ही गरम झाली की त्यामध्ये हवं तेवढं दूध मिक्स केलं. आणि हा पदार्थ छान उकळला की तयार होते रोस्टेड टी. ही रेसिपी @jasuja या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. आतापर्यंत ३ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांना ही रेसिपी आवडली आहे.
video of tea
अशी चहा तुम्ही यापूर्वी प्यायली नसेल..आली ‘रोस्टेड टी’..Video
- Advertisement -