राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद पवारांना आपली जात सांगून ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा द्यावी, असे आवाहन केले होतं. याला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे
कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले असून महसूल मंत्री आणि दुग्ध आणि पशूसंवर्धन मंत्री म्हणून ज्या खात्याचा कारभार राधाकृष्ण विखे-पाटील हे पाहत आहेत. त्याअंतर्गत येणाऱ्या दुधाचे भाव सध्या गडगडले आहेत. दुधाचे भाव कसे वाढावेत, यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. तसेच लोकसभा निवडणूक जवळ आली असल्यामुळे प्रत्येक जण जातीपातीचे राजकारण करत असल्याचेही रोहित पवारांनी यावेळी सांगितले.
शरद पवारांवर बोलण्यापेक्षा विखे पाटलांनी दुधाच्या दराकडे लक्ष द्यावं
- Advertisement -