Monday, March 4, 2024

‘ईडी’ चौकशीला गेल्यावर माझ्यावर कडून काही चुकीचं झालं तर… रोहित पवारांची भावनिक पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून २४ जानेवारीला चौकशी होणार आहे. यासंबंधीची नोटीस त्यांना पूर्वीच देण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मराठा मोर्चा येत असल्याने आपल्याला २२ किंवा २३ जानेवारीला बोलालावे, अशी विनंती पवार यांनी केली होती, मात्र ईडीकडून याला प्रतिसाद मिळाली नाही. त्यामुळे बुधवारी (२४ जानेवारी) रोजी होणाऱ्या चौकशीला सामोरे जाण्याचा पवार यांनी ठरविले आहे. त्यापूर्वी त्यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या चौकशीच्यावेळी आपल्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे याही येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वच यंत्रणांवर केंद्र सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत ईडीने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये, पवार यांच्यासोबत ठामपणे राहावे, असे आवाहन रोहित पवार यांनी पोस्टमधून केले आहे. त्यांचे आजोबा शरद पवार यांच्याबाबतीतही पूर्वी असाच एक प्रकार घडला होता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles