उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांचा निर्णय पटला नसल्याचे बोलून दाखवले. भाऊ म्हणून तुझे सगळे ऐकले, पण आता नाही असे म्हणत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार म्हणाले की, जी भूमिका श्रीनिवास काकांनी मांडली ती भूमिका अख्या महाराष्ट्राची आहे. सामान्य लोकांना कुठेही तुम्ही विचारलं की, काय वाटतं तर त्यांचे हेच मत आहे की, आपल्या काकाला सोडून जाणं हे योग्य नव्हतं आणि तीच भूमिका श्रीनिवास काकांनी दाखवून दिलेली आहे.
पवार म्हणून आम्ही विचाराबरोबर आहोत आणि विचार जर कोण जपत असेल तर शरद पवार साहेब आहेत.अख्खं पवार कुटुंब हे विचाराबरोबर, साहेबांबरोबर आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दादांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. दादा आणि त्यांचं जवळच जे कुटुंब आहे. त्याच्यामध्ये काकी आणि दोन मुलं आहेत. त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. त्यांना पवार कुटुंबीयांनी एकटं पाडलं नाही. त्यांनी स्वतः निर्णय घेऊन बाजूला होऊन स्वतःला एकटं पाडलेलं आहे, असे त्यांनी म्हटले आहे