सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या रोहित पवारांचा संघर्ष स्वत:च्या अस्तित्वासाठी..
आमदार रोहित पवार यांनी सध्या राज्यात युवा संघर्ष यात्रा काढली असून ही यात्रा तेरा जिल्ह्यातून नागपूरला जाणार आहे. या यात्रेवरून भाजपचे नगर जिल्ह्यातील पदाधिकारी सचिन पोटरे यांनी आ.रोहित पवारांवर जहरी टिका केली आहे. रोहित पवार हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेले असून कोट्यवधींचे मालक आहेत. त्यांचा संघर्ष हा स्वत:च्या अस्तित्वासाठी असल्याची टिका पोटरे यांनी व्टिट करून केली आहे.
पोटरे यांनी म्हटले आहे, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेले व कोट्यवधी चे मालक
हे सध्या चे अध्यक्ष असून बारामती ऍग्रो या कंपनीचे अध्यक्ष आहेत ,त्यांचे अनेक खाजगी साखर कारखाने ,कंपन्या असून महाविकास आघाडीचे सरकार असताना विकास न करता कर्जत जामखेड मध्ये त्यांनी दादागिरी ,दहशत , आणि दडपशाही करून स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता आणण्याचा प्रकार केला त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या अनेकांना दादागिरी ला सामोरे जावे लागले असून अनेक निवडणुकीत उमेदवारांना धमकी देऊन उमेदवारी अर्ज काढायला लावले व अनेकांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत अनेक जेष्ठ नेत्यांना त्यांनी एकेरी उल्लेख करून अपमान केला आहे
महाविकास आघाडीची सत्ता गेल्यामुळे
हा संघर्ष त्यांच्या स्वतः च्या अस्तित्वासाठी असून..