Tuesday, February 27, 2024

Video:रन आऊट होताच चढला रोहितचा पारा; धावेसाठी नो म्हणणाऱ्या गिलवर संतापला

आज अफगाणिस्तान आणि भारताच्या क्रिकेट संघात पहिला टी२० सामना खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारताने अफगाणितास्तानला पराभूत केलं. यामुळे खेळाडूंसह सर्व भारतीय क्रिकेट प्रेमींच्या चेहऱ्यावर आनंद आहे. परंतु भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिल मात्र दुखी असेल. त्याचं कारण त्याला पडलेला कर्णधार रोहित शर्माचा ओरडा.
रोहित शर्मा बऱ्याच दिवसांनी भारताकडून टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. वर्ल्डकपमध्ये प्रत्येक सामन्यात आक्रमक खेळी त्याने केली होती. तीच अपेक्षा मनात ठेवून रोहितने फलंदाजीला सुरुवात केली, पण एकही धाव न करता त्याला माघारी परतावे लागले. शुबमन गिलने धावेसाठी नकार दिल्याने रोहितला आपली विकेट गमावावी लागली.शुबमन गिलने त्याला धाव घेण्यास नकार दिला. गिलचा इशारा समजेपर्यंत रोहित नॉनस्ट्राइक इंडला पोहोचला होता. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी संधीचा फायदा घेत स्ट्राईक एंडला रोहितला धावबाद केले. अशात रोहित शून्यावर धावबाद झाला. आऊट झाल्यानंतर रोहित शुबमन खूप रागावला होता. हातवारे करून शुभमनला अनेक गोष्टी ऐकवल्या असल्याचं दिसत आहे. दरम्यान रोहित बाद झाल्यानंतर शुभमनने काही काळ फलंदाजी केली. यानंतर तोही बाद झाला. १२चेंडूंचा सामना करत शुबमनने ५ चौकारांच्या मदतीने २३ धावा केल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles