वाघ शेतात बिंधास्तपणे फिरत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. वाघाच्या बाजूला काही अंतरावर एक शेतकरी ट्रॅक्टरने नांगरणी करत असल्याचं दिसत आहे. शेतकरी या वाघापासून दूर उभा असला तरीही वाघ हल्ला करण्याची शक्यता टाळता येत नाही. पण हा वाघ शांतपणे शेतातून दुसऱ्या जागी निघून जात असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हे संपूर्ण थरारक दृष्य कॅमेरात कैद झालं असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तसंच दुसरा एक शेतकरी शेतात काम करत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे
Tractors & tigers coexisting…
That’s the strength on which our tiger population grew when it is getting decimated in other tiger land countries.
Via Ramesh Pandey pic.twitter.com/a9dedh7vzs— Susanta Nanda (@susantananda3) July 9, 2023