Tuesday, April 23, 2024

‘मुजरा फक्त महाराजांना’! अभिनेत्रीनं दिला त्या राजकारण्याला मुजरा करण्यास स्पष्ट नकार…

‘बिग बॉस मराठी सीझन ४’मध्ये झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री रुचिरा जाधव हिने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली. संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सण असल्यासारखं आपल्या राजाची जयंती साजरी होतेय. अशातच रुचिराने देखील महाराजांच्या फोटोसोबतची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. रुचिताने पोस्ट करत लिहिलं, ‘महाराज, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवजयंती च्या निमित्ताने एक आठवण share कराविशी वाटते. बिग बॉसच्या घरात असताना दर आठवड्याला एंटरटेनमेंट डेच्या दिवशी कोणी ना कोणी पाहुणे येत असत. असंच एका शुक्रवारी एक प्रतिष्ठित व्यक्ती आली होती, जी स्वतः कलाकार होती तसेच राजकारणाशी सुद्धा संबंधित होती. कार्यक्रम झाल्यावर त्यांना आदराने बाहेर पाठवताना आमच्यापैकी एकाने कोणीतरी ‘ए चला, त्यांना मुजरा करूया’ असं म्हटलं. मग काय, सगळ्यांनी वाकून मुजरा केला. मी मात्र तशीच उभी होते. मला विचारलं, तू का मुजरा केला नाहीस, मी म्हटलं, ‘मुजरा फक्त महाराजांना’! तत्व म्हणजे तत्व. दिखावा मला कधी जमला नाही आणि जमणार ही नाही. आणि कोणासमोर झुकायचं, कोणासमोर नाही हेच जर कळलं नाही, तर काय शिकलो आपण महाराजांकडून. मुजरा राजे, जय शिवराय.’

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles