खा.सुप्रिया सुळे यांनी लोकसभेतील भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली. भाजपकडून राष्ट्रवादीवर विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळयाचे आरोप सातत्याने करण्यात आले होते. आता अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यावर खा.सुळे यांनी भाजपला याच भ्रष्टाचाराच्या आरोपाची आठवण करून देत चौकशी करण्याची मागणी केली. खा.सुळे यांच्या या मागणीनंतर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंवर टिका केली आहे. शिळया कढीला उत आणण्याचा प्रकार सुरु असल्याच चाकणकर यांनी सुळे यांचे नाव न घेते म्हटलं आहे.
शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार…रुपाली चाकणकरांचा थेट सुप्रिया सुळेंवर निशाणा
- Advertisement -