Friday, July 11, 2025

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर विधानसभा लढवणार!

पुणे जिल्ह्यातील खडकवासला मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केली आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी विधानसभा लढण्याची इच्छा बोलून दाखवली.
2019 मध्ये मी खडकवासला मधून मी उमेदवारी मागितली होती. तेव्हा मला राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं होतं. लोकसभेत खडकवासला मधून मताधिक्य आहे. माझ्या मतदारसंघातून सुद्धा सुनेत्रा पवार यांना मताधिक्य आहे. नक्कीच माझी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे. पण तरिही महायुती जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचं प्रस्थान झालं आहे. वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालत चालली आहेत. या वारीत विविध उपक्रम राबवण्यात येतात. या उपक्रमांवर रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दर वर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आरोग्यवारी अभियानाचे उपक्रम राबवण्यात आला आहे. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना सोयीसुविधा देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केलं जातं, असं त्या म्हणाल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles