राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांच्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे नेते टीका करणे टाळत होते. त्यानंतर मात्र, आता दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रत्युत्तर सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली आहे. रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जोरदार पलटवार केला आहे.
रूपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर रोहिणी खडसेंनी प्रत्युत्तर दिले आहे. खासदार सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी निवडून आणले आहे, असे वक्तव्य अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले होते. दरम्यान रूपाली चाकणकर यांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं असा टोला रोहिणी खडसे यांनी लगावला आहे.