मागून अन् पुढून चालणाऱ्या बांडगूळासारखेच गोपीचंद पडळकर असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना सुनावलं आहे. सध्या राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजत असल्याने या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर वक्तव्य केलं. त्यावरुन रुपाली ठोंबरे-पाटील यांनी पडळकरांना सुनावलं आहे. ठोंबरे-पाटील म्हणाल्या, बांडगूळ जसं पुढून चालतं, तसंच मागूनही चालतं त्या पद्धतीचे गोपीचंद पडळकर आहेत, बांडगूळ गोपीचंद पडळकरांनी अजितदादांवर बोलूच नये, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच अजितदादांना मान्यता दिली आहे त्यामुळे त्यांनी मानायचं की नाही? हा प्रश्न येतोच कुठून? असा सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे.