राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सचिवपदी सचिन डेरे यांची नियुक्ती
अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या जिल्हा सचिवपदी सचिन डेरे यांना निवडीचे पत्र माजी आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या त्यांच्या हस्ते देण्यात आले, यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरणे शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करावे लागणार आहे पक्षाने दिलेल्या पदाचा उपयोग जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा सचिन डेरे हे युवक असून त्यांचा उपयोग नक्कीच पक्ष वाढीसाठी होईल पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असून त्यांनी राज्य शासनामध्ये घेतलेले निर्णय योजना नागरिकांपर्यंत घेऊन जावे असे ते म्हणाले
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहिल्यानगर जिल्हा सचिव पदी सचिन डेरे यांची नियुक्ती करण्यात आले आहे सचिन डेरे यांना नियुक्तीपत्र देताना माजी आमदार अरुण काका जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते सर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, व राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारणी यावेळी उपस्थित होते
सचिन डेरे म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सचिवपदी माझी निवड झाली असून माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत पक्ष वाढीसाठी काम करत संघटन केले जाईल व राज्य शासनाच्या विविध योजनांची नागरिकांमध्ये जनजागृती करेल शिक्षण, आरोग्य, रोजगार याची माहिती होण्यासाठी युवकांमध्ये कार्यशाळेचे आयोजन केले जाईल असे ते म्हणाले