अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. याबद्दलचे पुरावे सीबीआयकडे आहेत. मी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे, असं म्हणत वाझेनं एकच खळबळ उडवून दिली आहे.
सीबीआयकडे याबद्दलचे पुरावे आहेत. मी या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. मी सगळे पुरावे जमा केलेले आहेत. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी त्या पत्रात जयंत पाटील यांचंही नाव नमूद केलं आहे,’ असं वाझेनं म्हटलं. पोलीस घेऊन जात असताना वाझेनं माध्यमांशी संवाद साधला